Saturday, March 11, 2023

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी

 आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा, मांगरूळ येथे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांची भाषणे झाली.


सावित्रीबाई फुले स्मृती दिना निमित्ताने  विनम्र अभिवादन

मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला

पहिल्या महिला शिक्षिका

स्मृतिदिन - १० मार्च  इ.स. १८९७

सावित्रीबाई फुले यांचा जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ 

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७

 सावित्रीबाई फुले ह्या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला.... असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. फातीमा शेख यांनीही क्रांती ज्योती सावित्रीमाईच्या कार्यास मदत केली...

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून "बालहत्या प्रतिबंधक गृह" सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या* काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव "यशवंत"ठेवले.आशा या महान क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांना कोटी..कोटी वंदन.  

Friday, March 10, 2023

जागतिक महिला दिन

 जि प केंद्रशाळा, मांगरूळ येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक राजेश पवार सर यांनी जागतिक महिला दिना बद्दल माहिती सांगितली.

जागतिक महिला दिनाच्या दिवशी तीन विद्यार्थिनींचा वाढदिवस  साजरा करण्यात आला.




जागतिक महिला दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!              

८ मार्च स्त्री अस्तित्व हक्काच्या लढ्याचा दिन

आज आपण २१ शतकात वावरत आहोत. स्त्रियांनी पुरूषी वर्चस्वाला झुगारून जबरदस्त धक्का दिला आहे. आपल्या भोवतालच्या बंधनांना झुगारून दिले आहे. स्त्री ही अबला नसून कर्तबगार तेजस्वी स्त्री असल्याचे तिने स्वकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. देशाच्या राष्ट्रपती*, *प्रधानमंत्रीपदापासून ते अनेक विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. आज महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण होत आहे. त्याचे श्रेय द्यावे लागते स्वातंत्र्यापूर्वी समाज सुधारकांनी सुरू केलेल्या स्त्री-मुक्ति चळवळीला, त्यांच्या दूरदृष्टीला. ८मार्च हा जगभर "महिला दिन" म्हणून साजरा होतो. पण ८ मार्च का? असा प्रश्न  अनेकांचा मनात असतो. त्यामुळे महिला दिनाच्या इतिहासामागील पाश्वभूमी पाहणे आवश्यक वाटते. स्पेनमध्ये  मार्च १९३७ मध्ये स्त्रियांनी आपल्या एकजुटीचा प्रत्यय दाखवित आपल्या हक्काच्या रक्षणासाठी मुसेलेलिनाच्या अन्यायकारी राजवटीविरुद्ध जोरदार आवाज उठविला. ८ मार्च १८५७ रोजी अमेरिकेतील कापड गिरण्यांमधील महिला कामगिरांनी कामाचे तास१६ वरून १० वर आणण्यासाठी प्रस्थापित मालक़ वर्गाविरुध्द आपल्या हक्कासाठी लढा दिला.८ मार्च१९०८ या दिवशी अमेरिकी तील न्यूयॉर्क शहरामध्ये हजारो महिला त्यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, कामाचे तास निर्धारित असले पाहिजे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सोयी व सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी पहिल्यांदा रस्त्यावर उतरल्या व त्यांनी आपला हक्क मिळविला त्यांच्या याकामगिरीच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो. ८ मार्च १९७४ साली व्हिएतनाम स्त्रियांनी भांडवलशाही विरोधात निदर्शने करून आम्हीसुद्धा आमच्या मूलभूत हक्कासाठी सज्ज असल्याचे जगास दाखवून दिले. ८ मार्च १९७४ हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात राहिला इराणाच्या स्त्रियांनी स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या  मूलभूत हक्क उपभोगण्यास मिळावा याकरिता उठविलेल्या आंदोलनाकरिता ५० हजार स्त्रियांनी रस्त्यावर उतरून निर्देशने केली. वरील सर्व घटनावरून असे दिसते की, जगातील स्त्रीजमातीवर जेव्हा- जेव्हा अन्याय झाला, तेव्हा-तेव्हा एकजुटीने प्रचंड ताकदीने त्याचा प्रतिकार केला आहे. त्यामुळे ८ मार्च हा त्यांच्या अस्तित्व हक्कांच्या लढ्याचा मानबिंदू आहे. अमेरिकन स्त्रीला १९०८मध्ये मतदानाचा अधिकार रस्त्यावर उतरून आंदोलन करुन मिळाला. पण  भारतीय स्त्रीला मतदानाचा अधिकार न लढता, न आंदोलन करता १९५० ला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे राज्यघटनेतून मिळाला. २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमल सुरु झाला.

    विषमतावादी धर्म व्यवस्थेने आणि मनूने स्त्रीला दासी, दास्य आणि दुःखाच्या दरीतच लोटले होते. ती त्या दरीतून कधीही बाहेर  येऊ नये अशी व्यवस्था मनूने करून ठेवली होती. चूल आणि मूल व कुटुंबाची सेवा करणे या पलीकडे ती कधीही जाऊ नये, म्हणून धर्माने फार काळजी घेतली होती. पुरूष अंहकार इतका जपला व जोपासला जात होता की, स्त्री सतत त्याच्या दबावाखाली वावरत होती. जगत होती व त्याच स्थितीत मरत होती. तिचे हक्क व अधिकार तिला मिळत नव्हते व कळतही नव्हते. तिला कोणी समजूनच घेत नव्हते. मात्र तिने घरातील सर्वांना समजावे,सर्वांची सेवा करावी, असा धर्मव्यवस्थेचा दंडक होता. या दंडकाला पहिला क्रांतिकारी छेद दिला तो तथागत भगवान  बुध्द यांनी स्त्री सुध्दा माणूसच आहे. तिला माणसाच सर्व अधिकार व हक्क प्राप्त झाले पाहिजे., तिला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, ती सर्व श्रेष्ठ आहे, असे आग्रही प्रतिपादन तथागतांनी केले. एवढेच नव्हे तर भिख्खू संघात महिलांना स्थान दिले. भिख्खूंनी संघाची स्थापना केली. अशा रितीने स्त्रीला* *समानतेची वागणूक देणारे भगवान बुद्ध हे पहिले महामानव ठरले.

  त्या नतंर राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्यासाठी प्रथम आपल्याच घरातील स्त्रीला म्हणजेच  स्वतःच्या पत्नीला सावित्रीमाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले. पुढे सावित्रीमाई व जोतिराव फुले यांनी स्त्री उद्धारासाठी व दलित उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. बालविवाह पध्दती बंद केली. विधवाविवाहपध्दती सुरू केली. विधवांचे मुंडन करण्याविरोधी आंदोलने केली. भारतीय स्त्रीजातीला शिक्षण देण्याचे महान कार्य फुले दाम्पत्याने केले. त्यामुळे महिला शिकू लागल्या, मानाच्या, मोक्याच्या व महत्वाच्या जागा पटकावू लागल्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर संविधानाद्वारे महिलांना उन्नतीचे व विकासाचे अधिकार व हक्क बहाल केले. महिलांचे विकासाचे परमोच्च* *शिखर म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत मांडलेले हिंदूकोडबिल या बिलात स्त्रियांना समान अधिकार व संपत्तीत समान वाटा. तथापि सनात्यांनी, जातीयवादी खासदार यांनी हे हिंदूकोडबिल संसदेत संमत होऊ दिले नाही. त्यामुळे स्वाभिमानी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व बाहेर पडले.

   तथागत भगवान बुध्द, जोतिराव फुले, व डॉ बाबासाहेब  आंबेडकरांचा त्याग, कष्ट व कार्य किती महिलांना ठाऊक आहे? आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय महिला पुऱूषांच्या बरोबरीने नव्हे एक पाऊल पुढेच आहेत. त्याचे सर्व श्रेय बुध्द -फुले, आंबेडकर  यानांच आहे.

                    

Friday, March 3, 2023

जागरूक पालक सुदृढ बालक

 आज दिनांक 3 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा, मांगरूळ येथे 'जागरूक पालक सुदृढ बालक'


अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

डॉक्टर अंभोरे आणि त्यांचा स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांची आरोग्य तपासणी सुद्धा केली.





सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

 जिल्हा परिषद शाळा मोखावणे केंद्र कसारा तालुका शहापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्...