जिल्हा परिषद केंद्र शाळा, मांगरूळ येथे आज दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेसंदर्भात चारोळ्या तयार केल्या. त्यातील काही निवडक चारोळ्या खालील प्रमाणे आहे.
माझ्या मराठीचे बोल
वाजे काळजात खोल
ओवी मधून पाझरे
उभी अमृताची ओळ.
विशाखा काँग्रेस पाटील इयत्ता सातवी
माझी भाषा माझी आई
माझी भाषा माझी माई
तिला कुणाची नाही हाई
माझी भाषा माझी आई.
रितू दीपक जाधव इयत्ता सातवी
ज्ञानदेवांनी रुजवली
ती भाषा मराठी.
शिवरायांनी टिकवली
ती भाषा मराठी.
आदिती पंडित पाटील इयत्ता सातवी
कुसुमाग्रजांची प्रसिद्ध विशाखा
तशी वि .स .खांडेकरांची ययाती
माझी मराठी दिव्य भाषा
जशी जोडते शब्दातून नाती.
प्रणाली गणेश राऊत इयत्ता सातवी
माझ्या मराठीचा गंध
जसा जाई जुई मोगऱ्याचा
माझा मराठीचा संग
जसा संत साधू सज्जनांचा
जागृती जेजुराम पाटील इयत्ता सातवी
माझ्या माय मराठीचा
फडकला भगवा झेंडा
जरी पटक्यात शोभे
त्याग, तेजाचा गोंडा
भाविका पिंटू पाटील इयत्ता सातवी.
मातृभाषा महाराष्ट्राची
आहे मराठी भाषा
तिला समृद्ध करण्याची
आहे माझी आशा.
भूमिका पिंटू पाटील इयत्ता सातवी
माय मराठी गळ्यात घाली
लोककलेच लेणं
मराठमोळी माणसाचं हे
लाख मोलाच सोन.
वैदवी पप्पू मडवी इयत्ता सातवी.
मराठी आमची मायबोली
मराठी आमचा अभिमान
एक मुखाने सारे गाऊ
मराठी भाषेचे गुणगान.
पायल अंकुश पाटील इयत्ता सातवी
महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने घडावा
मराठीचा पडघम
कर्तुत्वाने वाजावा.
वैष्णवी नरेश पाटील इयत्ता सातवी.
माझी भाषा माझी शान
माझ्या भाषेचा मला अभिमान
मराठीचा आम्ही राहतो मान
मराठी भाषेचा आम्हाला अभिमान.
सम्यक एकनाथ जाधव इयत्ता सातवी
आपल्या मराठी भाषेची
राखतो आम्ही शान .
मराठी भाषा आहे ,
महाराष्ट्राची शान .
संस्कार दिलीप पाटील इयत्ता सातवी
उद्धारिले ज्ञानदेव जगी
मायबोली मराठी भाषा
अमृताची घेऊन गोडी
जगी वाढेल मराठी भाषा
सलोनी चंद्रकांत पाटील इयत्ता सातवी
मराठी आपली बोली
मराठी आपली शान
मराठीचा आहे मला अभिमान
गाऊ आपण मराठीचे गुणगान.
जान्हवी सुनील भोईर इयत्ता सातवी
माझी भाषा माझी शान
माझी भाषा माझा मान
जगी गाजते माझ्या मराठीचे गुणगान
म्हणूनी मला माझ्या मराठीचा अभिमान.
रवीना बाळाराम पाटील इयत्ता सातवी.
मराठीत धाडला सांगावा
मराठी मनात रुजवावा
आज आहे मराठीचा गौरव दिन
साजरा करतो मराठी राजभाषा दिन.
रसिका अनिल पाटील इयत्ता सातवी.
मराठी भाषा आहे
म्हणून तर माझी शान आहे
मराठी भाषेची शान आहे
म्हणून तर मला मान आहे.
वंश बाळा पाटील इयत्ता सातवी.
माझा शब्द माझी लेखणी
माझे विचार मराठी
माझा श्वास माझी स्फूर्ती
माझा आचार मराठी.
तनुश्री दत्ता पाटील इयत्ता सातवी .
जाणता शिवाजी राजा माझा
एकच असा होऊन गेला
इतिहासाच्या पानांमध्ये
नाव आपले करून गेला.
ओमकार भरतरी पाटील इयत्ता सातवी.
छाती होती पोलादी ज्यांची
डोळ्यात ज्यांच्या अंगार
या माझ्या शिवबाचा
आजही होतो जय जय कार .
कार्तिक शर्मानंद भारद्वाज इयत्ता सातवी.
मराठी राजभाषा आमची आहे महाराष्ट्राची शान
भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान
काना मात्रा वेलांटीचे मिळाले तिला वाण
साहित्य अन् इतिहास मराठीचा आहे महान
यश कमलाकर पाटील इयत्ता सातवी.
किती भाषा आल्या
किती भाषा गेल्या
परी उत्तुंग कीर्ती मराठीची
तेथे पुरतील का चार ओळी
नमित अशोक म्हात्रे इयत्ता सातवी
मातृभाषा महाराष्ट्राची
महान मराठी भाषा
तिला समृद्ध करण्याची
ठेवू मनी आशा
धीरज एकनाथ पाटील इयत्ता सातवी
भगवे आमचे रक्त
आम्ही राखितो स्वराज्याचे तख्त
आम्ही फक्त आणि फक्त
छत्रपती शिवरायांचे भक्त.
मयूर कुंडलिक मढवी इयत्ता सातवी.
माझी भाषा मराठी
माझी संस्कृती मराठी
माझे विचार मराठी
माझा आचार मराठी.
नंदिनी हरिचंद्र पाटील इयत्ता सातवी.
आन-बान शान
मराठी भाषेचा आम्हाला अभिमान
मराठी भाषा आमचा मान
मराठीला देतो आम्ही सन्मान.
अंश राजू कोंडिलकर इयत्ता सातवी.
माझी मराठी आहे छान
माझी मराठी आहे महान
माझ्या मराठीचा मला अभिमान
मराठी भाषा महाराष्ट्राची शान.
दक्ष मनोहर पाटील इयत्ता सातवी.
मराठीचा गंध वेगळा
मराठीचा रंग वेगळा
मराठीचा संग वेगळा
मराठी माणूसही वेगळा.
हरेश सुनील पाटील इयत्ता सातवी.
marathi official language day.
Zilla Parishad Center School, Mangrul today dated 27th February.
Marathi Official Language Day was celebrated on 2023. Various activities were conducted in the school on this occasion. Students of class 7th have prepared charolia about Marathi language.
































































