साखरोली शाळेत वॉटर फिल्टर व वॉटर कुलरचे लोकार्पण
साखरोली : आज बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी अधिकमास एकादशीचे औचित्य साधून साखरोली येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर फिल्टर व वॉटर कुलर बसविण्यात आला.
ही सुविधा Blessed Group यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी संस्थापक अध्यक्षा Anuji Chaudhary यांचे विशेष योगदान लाभले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणारे आदरणीय केंद्रप्रमुख Shri Dhimte यांचे शाळेच्या शिक्षकवर्ग व शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून शाळेच्या आरोग्यदायी वातावरणात मोठी भर पडणार आहे. गावातील पालक व नागरिकांनी या सामाजि
क उपक्रमाचे कौतुक केले.


No comments:
Post a Comment