Wednesday, April 26, 2023

मांगरूळ केंद्रातील बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम

 आज दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी मांगरूळ केंद्रातील नेवाळी शाळा येथे मांगरूळ केंद्रातील बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

मांगरूळ केंद्राच्या केंद्रप्रमुख  खरनारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

मांगरूळ केंद्रातील शिवकांत खोडदे सर , संतोष शेडगे सर , संजय खरनारे सर, विद्या उंडे  मॅडम, दर्शना मॅडम ,या शिक्षकांची बदली झाली आहे म्हणून केंद्राच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय परदेशी साहेब ,अंबरनाथ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय मेंगाळ साहेब, ठाणे जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक राणू बनसोडे सर यावेळी निरोपीय शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. तसेच नेवाळी ग्रामपंचायतच्या सरपंच जाधव ताई या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.






































No comments:

Post a Comment

सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

 जिल्हा परिषद शाळा मोखावणे केंद्र कसारा तालुका शहापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्...